केवळ एक रुपयात लग्न करणे हीच खरी समाजसेवा

0

अ‍ॅड.याकुब तडवी ; मोठ्या वाघोद्यात तडवी-भील समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

रावेर- आदिवासी संघर्ष मोर्चा, समाजसेवक, नोकरदार, अधिकारी, कर्मचारी समाजसेवक या सर्वानी एकत्र येवून विवाह सोहळ्यात वधू-वरांकडून नाममात्र एक रुपया फी घेवून मोठ्या थाटात समाजातील गरजवंतांचे लग्न करवुन देणे हीच समाजाची निस्वार्थ व खरी सेवा असल्याचे विचार अ‍ॅड.याकुब तडवी यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मोठे वाघोदा येथे तडवी-भील समाजाच्या सामूहिक सोहळ्यात ते बोलत होते. मेळाव्यात 11 वधू-वरांचे लग्न लावण्यात आले. प्रसंगी पर्यावरण संवर्धनासाठी जोडप्यांना प्रत्येक एका वृक्षाचे रोप देण्यात आले. प्रसंगी रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी करण्यात आली.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर सेवानिवृत्त सेल टँक्स कमिश्नर नासेर अकबर खा तडवी, अनिल तडवी, मजित हमीद तडवी, डॉ.अमीत तडवीद, डी.के.महाजन, किशोर पाटील, राजु अमीर, जगदीश पाटील, मुकेश तावडे, लक्ष्मीकांत चौधरी, बबलु तडवी, एच.एन.तडवी, कालु मिस्तरी, अहमद जबरा, मुक्तार तडवी, सुजात हमजान, अंजुम रहिमान तडवी, नजमा ईरफान तडवी, शबाना मुराद तडवी सकीना अकबर तडवी, शेख हनीफ आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी हनीफ बोंदर तडवी यांनी स्वखर्चातून समाजासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. डॉ.अमीत तडवी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली.

यांनी घेतले परीश्रम
मेळावा यशस्वीतेसाठी सुभान महेबुब, ईब्राहीम सिकंदर, राजु अकबर तडवी, मुबारक (राजु) अलीखा मिरखा तडवी, रहेमान तडवी, बिस्मिल्ला तडवी, यासीन तडवी, आरीफ तडवी, असलम तडवी, संजु रमजान, जावेद लोहार, अतुल तडवी, मेहरबान तडवी, शाहरूख तडवी, सिकंदर तडवी, रसीद मिसरी, उस्मान हाजी बुर्र्‍हान, युसूब मिस्तरी, फकिरा हसन, युसूफ महंमद हुसेन, सिकंदर मुसा तडवी, दिलावर तडवी, बी.आर.तडवी, तलवार सिंग, भिकारी तडवी, आदिवासी संघर्ष मोर्चा, तडवी-भिल समाज सेवक नोकरदार ग्रुप, युवा कृती समिती जिल्हा समाज सेवक ग्रुप, तडवी डॉक्टर फाऊंडेशन, तडवी द गाईड आदी कला कृती सांस्कृतिक मंडळ यासह तडवी समाजातील सर्व संघटनेने परीश्रम घेतले.