KYC update becomes expensive: Isma in Chincholi has to pay Rs 2 lakh जळगाव : केवायसी अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी चिंचोलीच्या इसमाला एक लाख 90 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओटीपीला क्लीक करताच रक्कम कपात
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी प्रमोद नामदेव पाटील (39) हे खाजगी नोकरी करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करतात. दि 27 रोजी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खाते नंबरला इंटरनेट बँकिंग करीत असतांना मोबाईलवर त्यांना अपडेटसाठी एक संदेश आला. यावेळी ओटीपी ओपन झाल्याबर त्यांच्या खात्यातून तब्बल एक लाख 90 हजार रुपये कपात करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.