मुंबई – देवगडच्या हापूस आंब्याला राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. आता मराठवाड्याच्या ङ्गकेशरफ आंब्याचा प्रवासही हापूसच्या मार्गावर सुरू झाला असून त्याला भौगोलिक चिन्हांकन (जिऑग्राफिकल इंडिकेशन, जीआय) मिळाल्याने कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर केशर ब्रँड विकसित होईल. विशेष म्हणजे रत्नागिरीच्या हापूसला अद्याप जीआय मानांकन मिळू शकले नाही.
गेल्या वर्षी राज्य सरकारने बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) अंतर्गत राज्यातील 13 प्रमुख कृषी व फलोत्पादन पिकांचे भौगोलिक चिन्हांकन नोंदणीसाठी (जीआय) निधी उपलब्ध करून दिला होता. या 13 पैकी 11 पिकांना भौगोलिक चिन्हांकन मिळाले असून यात मराठवाड्याचा केशर आंबा, लासलगावचा कांदा, बीडचे सीताफळ, जालन्याची मोसंबी, जळगावचे भरीत वांगे, जळगावचीच केळी, सोलापूरचे डाळिंब आदी पिकांचा समावेश आहे.
केशर निर्यात करणे सोपे
चिन्हांकनामुळे केशरची पुढील दहा वर्षे निर्यात सोपी होणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडेल. केशरला भौगोलिक मानांकन मिळाल्याने इतर कोणी या आंब्याचे अनधिकृत उत्पादन करू शकणार नाही.