आगरतळा – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्रिपुराचे राज्यपाल तथागता रॉय रजेवर असल्यामुळे केशरी नाथ त्रिपाठी यांना त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे.
राष्ट्रपती कोविंद हे २ दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यासाठी आगतरळा येथे दाखल झाले आहेत. विमानतळावर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब आणि उपमुख्यमंत्री जिष्णू देव बर्मन यांनी त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ते माताबारी ते सबरूम या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करतील तसेच माताबरी मंदिर कॉम्प्लेक्सच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील.