कार्यक्रमप्रमुखपदी अविनाश देवराम कुडे
हे देखील वाचा
तळेगाव दाभाडे : स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समिती 2019 च्या अध्यक्षपदी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष व वडगाव ग्रुपग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे यांची तर कार्यक्रम प्रमुखपदी अविनाश कुडे यांची निवड करण्यात आली. यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा रविवार, दि.28 एप्रिल 2019 रोजी होणार आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, उपाध्यक्ष सतीश तुमकर, सुनील दंडेल, सुनील शिंदे, सचिव सोमनाथ धोंगडे, सहसचिव बंटी वाघवले, खजिनदार मंगेश खैरे, सहखजिनदार संभाजी येळवंडे, व्यवस्थापक काशीनाथ भालेराव, विवेक गुरव, अरुण वाघमारे, संघटक नवनाथ कडू, शेखर वहिले, गणेश म्हाळसकर, संतोष चव्हाण, गणेश झरेकर, सतीश गाडे, मनोज खेंगरे. यावेळी पत्रकार गणेश विनोदे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, महेश तुमकर, अनिल कोद्रे, व्याख्याते विवेक गुरव, मावळ खरेदी विक्री संघाचे संचालक रोहिदास गराडे, विलास दंडेल, विनय लवंगारे, सतीश तुमकर, संभाजी येळवंडे, राजेश बाफना, शंकर ढोरे, अजय धडवले, सोमनाथ धोंगडे, सुनील दंडेल, महेंद्र तुमकर आदी उपस्थित होते.