केशवस्मृतीचा कार्यअहवाल व रूग्णवाहिकेचे लोकार्पण

0

जळगाव। केशवस्मृती सेवासंस्था समूहाचा कार्यअहवाल आणि रक्तपेढीच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आपल्या मुख्य भाषणात पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी केशवस्मृतीच्या विविध सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. तर खासदार ए.टी.नाना पाटील यांनी केशवस्मृतीला दिलेली मदत सत्कारणी लागेल असे मनोगत व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील रक्ताची मागणी बघता रक्तपेढीस ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ यासाठी आवश्यक असलेले ‘अफेरेसीस मशीन’ या अत्याधुनिक यंत्राची गरज लक्षात घेता. खासदार ए.टी.नानांनी तत्काळ निधी जाहीर केला. अनेक लोकप्रतिनिधी आश्वासनांची खैरात देत असतात मात्र त्याची पूर्तता होत नाही. आज जळगावकरांना या लोकप्रतिनिधीचा वेगळा अनुभव आला. आपले भाषण संपण्याच्या आताच व्यासपीठावर मशीन घेण्याबाबतचे मंजुरी पत्र केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांना सुपूर्द केले.

व्यासपिठावर यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपिठावर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख भरत अमळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील भामरे रक्तपेढीचे सहप्रकल्प प्रमुख डॉ.रवी हिरानी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, देवगिरी प्रांत सेवा विभाग प्रमुख योगेश्वर गर्गे, जळगाव जनता सह. बँकेचे अध्यक्ष अनिल राव, अखिल भारतीय बँकिंग प्रकोष्टचे प्रमुख संजय बिर्ला, रेखा गॅसचे संचालक दिलीप चौबे, आणि केशवस्मृतीचे संचालक मंडळ उपस्थीत होते.