पुणे : केशायुर्वेद या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बुकगंगा इंटरनॅशनलचे संस्थापक मंदार जोगळेकर उपस्थित राहणार आहेत.
वैद्य हरीश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या केशयुर्वेदमध्ये राज्यातील तीस उपकेंद्र प्रमुखांचा सत्कार, आयुर्वेदाच्या स्मृतीतून भाग 2चे प्रकाशन, रससिद्ध अरुणकुमार महाराज यांचे पारद किमया प्रयोग आणि असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकॉलॉजी अँड टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात येणार आहे. हणमंतराव गायकवाड, डॉ. अरुण जामकर, डॉ. सतीश डुंबरे, डॉ. सरिता गायकवाड यावेळी उपस्थित असणार आहेत.