वाघोली । केसनंद फाटा परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनता संघर्ष दलाच्या वतीने केसनंद फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुणे नगर रोड व वाघोलीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रस्त्याच्याकडेला मोठी कचर्याची समस्या, तसेच नागरी सुविधा पूर्ण मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अशा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनता संघर्ष दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या मार्गदर्शनखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वाघोलीचे ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते, लोणीकंद पोलिस ठाण्याचे सर्जेराव पाटील यांना वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा जनता संघर्ष दलाचे अध्यक्ष आंबादास रागपसरे, मनसे तालुका अध्यक्ष संदीप सातव, रवींद्र काळे, सुनील काळे, गणेश गोगावले आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.