केसीईच्या शाळांमध्ये आंतरशालेय नाट्य स्पर्धा उत्साहात

0

मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकचे वितरण

जळगाव – गुरुवर्य प.वि.पाटील व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त आंतर शालेय नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन के.सी.ई.सोसायटीचे संचालक लक्ष्मीकांत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, बेटी बचाओ बेटी पाढाओ, स्त्री शक्ती, गणेशोत्सव, मोबाइलचे दुष्परिणाम अशा विविध सामाजिक विषयांवर सुंदर अशा एकतीस नाट्यछटा सादर केल्या.

यांनी मिळविली पारितोषिके
स्पर्धेमध्ये पहिल्या गटात प्रथम चंचल पाटील (आचार्य विद्यालय), व्दितीय सिद्धी मेटकर (गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय), तृतीय धनश्री पाटील (आचार्य विद्या) , * दुसऱ्या गटात प्रथम खुशी पाटील (उज्ज्वल इंटरनॅशनल स्कुल), व्दितीय मानसी पिसे (ओरिअन स्कुल), तृतीय पायल थोरात (ए. टी. झांबरे विद्यालय), * तिसऱ्या गटात प्रथम दीपिका बैसास (उज्ज्वल इंटरनॅशनल), व्दितीय शलाखा कानगो (आर.आर.विद्यालय), तृतीय श्रावणी नाखरे (प.न.लुंकड कन्या शाळा) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
विजयी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, के.जी.फेगडे, चंद्रकांत भंडारी, प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, ए.टी. झांबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप चौधरी, पंच पंकज महाजन, दिनेश माळी यांच्याहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक चंद्रकांत कोळी, सतीश भोळे, योगेश भालेराव, तडवी सर, पराग राणे, कल्पना तायडे, सरला पाटील आदींनी परिश्रम घेतले.