नवी दिल्ली । महिलांच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या पी.व्ही. सिंधूचा आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जागतिक स्पर्धा 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे खेळली जाणार आहे. सिंधूच्या जोडीने पुरुष एकेरीच्या क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या किदंबी श्रीकांतवर भारताची या स्पर्धेत मदार असेल. भारताच्या या दोघा खेळाडूंचा जागतिक संघटनेने 3 ऑगस्ट रोजी जाहिर केलेल्या मानांकनाच्या यादीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये समावेश आहे. सिंधू आणि सायना नेहवाला महिला एकेरीच्या लढतीत आपली दावेदारी सांगतिल. पुरुषांच्या एकेरीच्या लढतींसाठी तिघा भारतीय खेळाडूंना प्रवेश देण्यात आला आहे. श्रीकांतच्या जोडीने अजय जयराम, साईप्रणित एकेरीच्या लढतीत भारताचे आव्हान उभे करतील. पुलेला गोपीचंद संघाचे मार्गदर्शक असतील. जागतिक भारतीय संघ पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या लढतींमध्ये सहभागी होणार आहे.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे :
महिला एकेरी : पी. व्ही. सिंधू (5), सायना नेहवाल (16), रुतुपर्णा दास (46), तन्वी लाड (91). महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी, संजना संतोष आणि आरती सुनील, जे. मेघना आणि पूर्वश्री राम. पुरूष एकेरी : के. श्रीकांत (8), अजय जयराम (16), साई प्रणित (19), समीर वर्मा (28).