जळगाव – के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेन्ट अर्थात शिक्षक विकास कार्यक्रमाचा यशस्वी समारोप सम्पन्न झाला . हा कार्यक्रम दिनांक ०९-०२-२०२२ ते १५-०२-२०२२ असा एक आठवडा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जेष्ठ अनुभवी वक्त्यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचा विषय “आय सी टी टूल्स फॉर एनहंसिन्ग क्वालिटी ऑफ हायर एजुकेशन “अर्थात “माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचा उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी उपयोग “या महत्वाच्या विषयावर सर्व प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचा देशातील विविध शहरातून २५० पेक्षा जास्त प्राध्यापकांनी लाभ घेतला .
हा कार्यक्रम पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग योजनेअंतर्गत येथील के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय आणि गुरु अंगददेव टीचिंग लर्निंग सेंटर श्री गुरु तेग बहाद्दूर खालसा कॉलेज , दिल्ली विदयापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता .
ह्या कार्यक्रमात डॉ. ए.के.बक्षी ,कुलगुरू पी.डी. एम. विद्यापीठ बहाद्दूर गड हरियाणा , डॉ. विमल रार प्रमुख गुरु अंगददेव टीचिंग लर्निंग सेंटर,शिक्षण मंत्रालय , डॉ अमृता मजूंमदार व डॉ सुदीप्ता मजूंमदार झारखण्ड विद्यापीठ, डॉ. शैलेश कासंदे पुणे, डॉ विवेक तिवारी रायपुर, डॉ मनीष जोशी कबचौ उमवि जळगाव, डॉ अरुण जुल्का दिल्ली विदयापीठ, प्रा रविंद्र वैद्य पुणे ह्या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. जसविंदर सिंघ , प्राचार्य श्री गुरु तेग बहाद्दूर खालसा कॉलेज , दिल्ली विदयापीठ, डॉ. बी एफ जोगी, बी ए टी यु लोनेरे, डॉ. शिल्पा बेंडाले आय एम आर जळगाव, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय दहाड ह्या मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षा देशमुख, प्रा. प्राची ओझा , प्रा. श्वेता माली , प्रा. पूजा नवाल, व आभार प्रदर्शन अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.