के सी ई सोसायटीचे अध्यापक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0

जळगाव : आज के सी ईसोसायटीचे अध्यापक विद्यालयात प्राचार्य डॉ.ए.आर.राणेयांच्या मार्गदर्शनाखाली “वाचन प्रेरणा दिन’’ साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाला डी.एल.एड. विभागप्रमुख प्रा. दुष्यंत भाटेवाल, प्रा.केतन चौधरी , प्रा.सौ.एच.टी.चौधरी,प्रा.सौ.एस.व्ही.झोपे ,प्रा.श्रीमतीएस.एस.तायडे,प्रा.श्रीमती एस.एम.पाटील, डॉ. डी एस.पवार ,प्रा.किसन पावरा, जयश्री तळेले उपस्थित होते. यावेळी मनीष बागुल, गायत्री झांबरे ,नेहा पाटील ,वैशालीराजपूत , सुवर्णा सूर्यवंशी यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवना विषयीची माहिती व ‘डॉ. कलाम यांची दशसूत्री’ या पुस्तकाचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद कायनात,प्रास्ताविक देवयानी जगताप तर आभार पूनम पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजयचव्हाण ,श्री. केतन चौधरी तसेच प्रथम व व्दितीय वर्षाच्याडी. एल.एड छात्राध्यापकांनी परिश्रम घेतले.