एस.एल.गायकवाड ; वरणगावात कैकाडी समाजाचा मेळावा
वरणगाव- स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही कैकाडी समाजावरील अन्याय दूर झालेला नाही, एकाच राज्यात समाजाला सपत्नीक वागणूक दिली जात आहे. हा क्षत्रिय बंधनाचा होणारा अन्याय दूर न झाल्यास समाज बांधव आंदोलन छेडतील, इसा ईशारा महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष एस.एल.गायकवाड यांनी आयोजीत मेळाव्यात इशारा दिला.भटक्या विमुक्त समाज बांधवाच्या मेळावा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मंगल ाकर्यालयात झाला. प्रसंगी गायकवाड बोलत होते.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष एस.एल.गायकवाड, नारायण गायकवाड, रोहिदास जाधव, शाम जाधव, आशा जाधव, अॅड.शिरीष जाधव, प्रा.स्वरूपचंद गायकवाड, नगराध्यक्ष सुनील काळे, नगरसेविका, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, नगरसेवक सुधाकर जावळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मेढे, संभाजी देशमुख, विलास मुळे, नितीन देशमुख, बी.डी.बोदडे, अशफाक काझी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. मेळावा यशस्वीतेसाठी दिलीप गायकवाड, किरण भुसांडे, राजु गायकवाड, प्रकाश जाधव, वाल्मीक जाधव, अंकुश गायकवाड, दीपक जाधव, रोहण भुसांडे, अजय जाधव, प्रकाश गायकवाड, मधुकर जाधव, सुरेश देवगिरे, गजानन देवगिरे, तुषार जाधव, सचिन जाधव, मनोज जाधव, अविनाश जाधव, राषी भुसांडे, ओम गायकवाड, प्रथमेश जाधव आदी समाजबांधवांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन तिभा तावडे यांनी तर आभार रवींद्र गायकवाड यांनी मानले.