कैदी पसार झाल्याचा फटका ; दोघा कर्मचार्‍यांचे निलंबन

0

जळगाव- जिल्हा कारागृहाच्या 17 फूट भिंतीवरून उडी मारून शेषराव सुभाष सोनवणे (वय 28, रा. बिलवाडी, ता. जामनेर) व रवींद्र भिमा मोरे (वय 29, रा. बोदवड) हे दोघे कैदी बुधवारी पहाटे पहाटे झाले होते. या गंभीर घटनेची दखल घेत भिशी अंमलदार बाळू उत्तम बोरसे व रात्री पाळीचे अंमलदार वासुदेव हिरामण सोनवणे या दोघांना कारागृहाच्या उपमहानिरीक्षकांनी गुरुवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केल्याने कारागृहातील कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. निलंबन काळात बोरसे याचे मुख्यालय नाशिक तर सोनवणे याचे जालना देण्यात आले आहे.