कैफच्या मदतीला धावली शबाना

0

मुंबई । भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं फेसबुकवर टाकलेल्या एका फोटोवरून त्याच्यावर टीकेचा भडिमार करणार्‍या कट्टरपंथीयांना अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

मोहम्मद कैफ यानं नुकताच त्याच्या फेसबुकवर मुलासोबत बुद्धिबळ खेळतानाचा फोटो शेअर केला होता. त्यावरून मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांनी त्याच्यावर टीका केली होती. मात्र शबाना आझमी यांनी कैफ याची पाठराखण केली आहे. ट्विटरवर फोटो बघणं इस्लाममध्ये ’हराम’ नाही का? असा सवालदेखील त्यांनी केला.