वरखेडी। लोणचे टाकण्यासाठी लागत असलेल्या कैर्या खरेदीसाठी वरखेडी बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र आवक वाढल्याने कैर्यांच्या भावात कमालीची घसरण झाली होती. 15 जून रोजी गुरुवार आठवडे बाजारात महिलांनी कैर्या खरेदीकरिता एकच गर्दी होती येथील ग्रामपंचायतच्या आठवडे बाजाराच्या आवारात कैर्यांच्या मोठा बाजार भरत असतो.
या बाजारात गुजरात, बलसाड, चिखली, सिल्लोड, बनोटी, भडगाव, चाळीसगाव, धरमपूर आदी भागातून ट्रक टेम्पो आदी वाहनातून कैरी विकणारे ठोक व्यापारी कैर्यांची खरेदी करीत आहे. बाजार पेठेत मोठी उलाढाल होत असून अनेकांना रोजगाची संधी उपलब्ध झाली आहे.
भावात घसरण
जून महिन्याची सुरुवात होताच लोणचे टाकण्यासाठी महिलांची लगबग सुरु होते. त्यासाठी मसाल्याच्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असतात. आठवड्याला बाजारात कैर्याची मोठी आवक झाल्याने भावात घसरण झाली होती. खरेदीकरिता चांगलीच गर्दी तुटून पडली असल्याचे व्यापार्याचे म्हणणे होते. बाजारात विक्रीसाठी आलेल्या कैर्यामध्ये राजपुरी, गावरान कैरी, सरदार, पछाडा अशा विविध प्रकारच्या बाजारात दाखल झाल्या होत्या. मागणी अधिक असली तरी भाव घसरले आहे.
कैर्या फोडणार्याना रोजगार
कैर्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढ्याच प्रमाणत खरेदीदारांची गर्दी वाढल्याने मागील आठवड्यापेक्षा या गुरुवारच्या बाजारात राजापुरी 25 ते30 रूपये प्रति किलो प्रमाणे तर गावरण कैरी फक्त 15 ते 20 रुपये किलो, सरदार 20 रु किलो प्रमाणे होती दरम्यान कैरी फोडण्यासाठी कैरी फोडणार्यानी दुकाने थाटली होती कैरी फोडणी व त्यासाठी लागणारे साहित्य घेवून ठिकठिकाणी कैरी फोडणारे 5 रुकिलो या प्रमाणे कैरी फोडून देत असतात त्यातून दिवसाकाठी 1ते 2हजार रुपये कमवितात या मुळे बेरोजगारांना या माध्यमातून रोजगारही मिळतो आणि कुटूंबाचा रोजगारही मिळतो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो