कैलासबुवा कडव यांचा गुरुपूजन सोहळा

0

कर्जत : कर्जत तालूक्यासह मुरबाड तसेच रायगड, ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असेलेले भजनी कलावंत कॅसेट फेम गुरुवर्य कैसास बुवा कडव यांचा गुरुपूजन सोहळा रविवारी रावगाव येथे उत्सहात पार पडला, यावेंळी कर्जत, खोपोली, मुरबाड भागातील अनेक शिष्य गणांनी गुरुचे पूजन करून अभंग सादर केले. तसेच तबला वादकांनी आपली कला सादर केली. गुरुवर्य कैलास बुवा कडवं यांच्या शिष्यगणांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन केले होते. दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन, वाद्य पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भजनी कलावंत भरतबुवा बडेकर, महेशबुवा देशमुख, संजयबुवा ओंबळे, वैभव मंडलिक, भूषण देशमुख, एकनाथ माळी, पोपटबुवा, वैभव थोरवे, तसेच वादक सुधीरबुवा कराळे, सुभाष भोईर, रोहन पाटील, महेश मोडक, गणेश लोभी, नितीन चौधरी आदीं कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली.