कैलास स्मशानभूमीत 2004 साली डिझेल दाहिनी उभारण्यात आली असून नियमित देखभालीअभावी त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
येथील डिझेलदाहिनी कालबाह्य झाली असून त्यातून दुर्गंधी पसरते. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि धूर व धुरामुळे येथे काजळी जमा झाली आहे. एकीकडे पर्यावरण रक्षणासाठी सर्वजण झटत असताना आणि वैकुंठ विद्युतदाहिनीत अंत्यविधी करणार्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथील दयनीय अवस्था बघता नागरिक येथे अंत्यविधी करण्यास धजावत नाहीत.