कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या स्मरणार्थ औषधी वृक्षांचे रोपण

वनविभाग कर्मचारी संस्था पुणे जिल्हा चेअरमन कै.दादा लिंबाजी कोळपे यांचे 15 मे 2021 रोजी निधन झाले . यांनी जीवनभर संघर्ष करत जनतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. गोरगरीब व सर्वसाधारण लोकांच्या गळ्यातील ताईत बनले त्याचे कारण म्हणजे दादानी लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते जसे एखादा वृक्ष सर्वांसाठी समान छाया, फळे देतो त्याचप्रमाणे कै.दादा लिंबाजी कोळपे यांनी लोकांना एकाकी कधीही वाटू दिले नाही. कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या मरनाअर्थ ” लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदारा कोळपे वस्ती येथे ग्रीन फाउंडेशन माध्यमातून जंगली वृक्ष- वड, पिंपळ, कडूनिंब,फणस,आबा,बिटी,चिंच,इलायची चिंच,उंबर, आवळा अशा विविध औषधी व जंगली वृक्षाचे केले रोपन.

वन विभाग लोणी काळभोर, लोणी काळभोर ग्रामस्थ, धनगर समाज सेवा संस्था , श्री.बाळासाहेब कोळपे,दत्तात्रय शेंडगे, भाऊ कोळपे,भानुदास कोळपे,मल्हारी कोळपे, जालिंदर रूपनर, दत्तात्रय चोरमले, युवराज दुबे,दादा कोळपे,धोंडिबा कोळपे,हेमंत कोळपे,विजय कोळपे,युवराज रूपनर, अमित जगताप ,जीवन जाधव उपस्थित होते.