कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पेर्धेतील 124 नाट्यछटा अंतिम फेरीत

0

पुणे ।नाट्य संस्कार कला अकादमीतर्फे आयोजित कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून विजेत्यांना बक्षीस प्रदान करून गौरविण्यात आले.

शिशु गटात श्रीजय देशपांडे, 1 ली व 2 रीच्या गटात कौशिकी वझे, 3 री व 4 थीच्या गटात अनाहिता जोशी, 5 वी ते 7 वी गटात यज्ञा मतकर व 8 वी ते 10 वीच्या गटात शर्व वढवेकर, तर खुला गटात विद्या ढेकणे यांनी पहिला क्रमांक पटकविला आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, मध्यप्रदेशातील इंदूर येथील मुक्तसंवादचे मोहनजी रेडगांवकर, प्रकाश पारखी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे केंद्रातून तब्बल 600 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापैकी 124 नाट्यछटा प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहचल्या होत्या. परिक्षक म्हणून अमोल जाधव, संध्या कुलकर्णी, दिपाली निरगुडकर, वैशाली गोस्वामी, आश्विनी आरे, दर्शन नाईक, अपुर्व साठे, विनिता पिंपळखरे, तृप्ती टिंभे, आशा काळे यांनी तर स्पर्धा प्रमुख म्हणून अनुराधा कुलकर्णी यांनी काम पाहिले. नाट्यछटा लेखनात विद्यार्थी गटात प्रांजला धडफळे, पालक गटात श्वेता देशमुख, राधा केतकर, मानसी वझे, श्रीकांत शामगांवकर व शिक्षक गटात नुपुरा किर्लोसकर, अनुराधा कुलकर्णी, अंजली दफ्तरदार यांनी पुरस्कार मिळवला.