कै. शंकर गावडे स्मृती कामगार भवनाचे भूमिपूजन

0

पिंपरी चिंचवड :- कामगार संघटना ही कामगारांच्या प्रगतीसाठी असली पाहिजे. कामगारांच्या कष्टामुळे त्यांच्या कुटुंबाची व देशाची प्रगती होते. कामगार केंद्रबिंदू ठेवून पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघ कै. शंकर गावडे यांच्या प्रेरणेतून काम करीत आहे. त्यांच्या नावाने थेरगाव येथे उभारण्यात येणारे कामगार भवन हे महाराष्ट्रातील कामगारांसाठी स्फुर्ती केंद्र व्हावे, अशी अपेक्षा आज कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन भूमिपूजनाचे समारंभाच्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती
यावेळी कैलास मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अपक्ष गटनेते कैलास बारणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका झामाबाई बारणे, निर्मलाताई कुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी, पतसंस्थेचे पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, समिती सदस्य चारुशीला जोशी, अंबर चिंचवडे, राजेश लांडे, चंद्रकांत इंदलकर, विजय खोराटे, मनोज माछरे, माणिक बुचडे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मनपातील व पीएमपीएलच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी पुढील महिन्यात मी स्वत: पुढाकार घेऊन कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींसह आयुक्तांबरोबर बैठक घेईल. कामगारांच्या वर्गणीतून गावडे कामगार स्मृती भवन उभे राहत आहे. ही प्रशंसनीय बाब आहे, असेही बापट म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन झिंजुर्डे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. हनुमंत लांडगे यांनी आभार मानले.