नंदुरबार । कै.शांताबाई रामचंद्र सोनवणे यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी आज त्यांच्या परिवाराने रक्तदान शिबीर घेतले. यात महिलांसह 9 जणांनी रक्तदान केले. सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी जयंत रामचंद्र सोनवणे तसेच येथील कलाल समाजाचे अध्यक्ष नितीन रामचंद्र सोनवणे यांच्या मातोश्री शांताबाई रामचंद्र सोनवणे यांचे दि. 8 मे रोजी निधन झाले होते. त्यांचे उत्तरकार्य व गंधमुक्तीचा कार्यक्रम दि. 19 मे रोजी आयोजित करण्यात आला होता.
जनकल्याण रक्तपेढीतर्फे राबविला उपक्रम
याच दिवशी त्यांच्या कुटूंबियांनी रक्तदान शिबीर आयोजीत करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला प्रतिसाद देत महिलांसह नऊ जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदान करणार्यांमध्ये राहूल बाळकृष्ण सोनवणे, राकेश वसंत कलाल, मनिषा राकेश कलाल, राजेश जयंत सोनवणे, योगेश जयंत सोनवणे, दर्शन नितीन सोनवणे, कल्याणी नितीन सोनवणे, राज राहूल सोनवणे, केदार पाटील यांचा समावेश होता. येथील जनकल्याण रक्तपेढीतर्फे रक्त संकलीत करण्यात आले. रक्तदान प्रक्रिया डॉ.अर्जुन लालचंदानी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ खलील काझी, कामिनी भोपे, संजय सूर्यवंशी यांनी पार पाडली. उत्तर कार्याच्या दिवशी रक्तदान शिबीर घेण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.