अंबाजोगाई : कै. हेमंत राजेमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील मोठ्या, दनशूर ,सामाजिक जान असलेल्या लोकांकडून त्यांच्याकडे त्यांच्या पाल्याच्या जुन्या सायकल एकत्रित करून व नंतर लोकसहभागातून त्या दुरूस्त करून गरजवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी याना वाटप करण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सहा सायकल उपलब्ध करण्याचा कार्यक्रम वेणूताई चव्हाण प्राथमिक शाळेत दि. २२ जानेवारी रोजी आयोजित केला होता.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा वेणूताई चव्हाण संस्थेच्या सदस्या रुपालीताई राजपाल लोमटे होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संतोष मोहिते, शंकरराव बोरकर इंग्लिश स्कूलचे सचिव ललित झिरमिरे, हेमंत राजेमाने संस्थेचे अध्यक्ष रवी देशमुख, उपाध्यक्ष महेश लोमटे, सचिव प्रवीण देशमुख, सदस्य शरद लोमटे,अजित देशमुख, प्रशांत मुंडे, सौरभ कुलकर्णी व पत्रकार नंदकुमार पांचाळ उपस्थित होते. यावेळी रवी देशमुख यांनी या उपक्रमाची थोडक्यात माहिती सांगून दानशूर व समाजातील लोकांना जुन्या व गरज नसलेल्या सायकल संस्थेच्याकडे जमा करण्याचे आवाहन केले. तसेच रोटरीचे माजी अध्यक्ष संतोष मोहिते यांनी हेमंत राजेमाने संस्थेच्या कार्याचा गौरव करून मदतीचे आश्वासन दिले .
अध्यक्षीय समारोप प्रसंगी रुपालीताई लोमटे यांनी हेमंत राजेमाने संस्थेच्या जुन्या सायकल एकत्रित करून, दुरुस्त करून गरजवंत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासनही लोमटे यांनी दिले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका स्मिता लोमटे पाटील यांनी 1000 रुपये लोकसहभाग दिला व इतरांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी वेणूताई चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका बुलबुले मॅडम ,डोंबे सर,लोढा मॅडम व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भोसले मॅडम यांनी केले.