नवापुर । लोकांचा सहभाग ज्या कामात होतो त्यामुळे शहराचा विकास होऊन ते काम सर्वांग सुंदर व इतरांना प्रेरणा देऊन जाते आणि लोक सहभागाने झालेले कार्य खरोखर एक आदर्श ठरते. शहरातही लोकसहभागाने कामे होत असतांना असेच एक सेवाभावी व पुण्यकार्य नवापूर येथील विविध लोकउपयोगी कामातून दाखवून दिले आहे. त्याचाच प्रत्यंतर नवापूर जनतेला आला स्व. देवीदास हेमाजी नागराळ पतसंस्था, नानाश्री ग्रुप व सेवा भावी संस्था व स्व गुरुप्रसाद रामप्रसाद जैसवाल यांच्या संयुक्त सहकार्याने नवापुर शहरात एक आदर्श असा उपक्रम घडला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण
सामाजिक कार्यकर्ते मनोहर नगराळे यांनी त्यांच्या कै. हेमाजी नगराळे पतपेढ़ीच्या माध्यमातून नवापुर शहरात विविध भागात बैंच ठेवले आहेत. तसेच सामाजिक भावना ठेऊन सामाजिक कार्यकर्ते पप्पू जैसवाल यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ व सामाजिक काम करणार्या नानाश्री ग्रुपने नवापुर शहरात अत्यंत गरजेची असणारी रामरथाची गरज पूर्ण करत मान्यवराच्या उपस्थितित लोकर्पण केला आहे. चालकपासुन इंधनाचा सर्व खर्च ह्या संस्था करणार आहेत. हे त्यांचे कार्य नवापूर कर सदैव लक्षात ठेवतील.
रामरथ(मोफत सेवा) तयार
नवापुर शहरात कै.देविदास हेमाजी नगराळे नागरी सहकारी पंतसंस्था नवापुर व नानाश्री ग्रृप सेवाभावी बहुद्देशीय संस्था.व गुरुप्रसाद रामगोपाल जयस्वाल यांचा स्मरणार्थ यांचा तर्फे रामरथ(मोफत सेवा) तयार करण्यात आला आहे. डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रामरथचे लोकार्पण विमलबाई गुरुप्रसाद जयस्वाल यांचा हस्ते फित कापुन करण्यात आले. यावेळी न.पा गटनेते गिरीष गावीत,न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, अजय पाटील, शिरीष प्रजापत,प्रा दिपक जयस्वाल,ईश्वर जयस्वाल,पप्पु जयस्वाल,जयेश जयस्वाल, इम्तियाज लाखाणी,इद्रीस टिनवाला,शांतिलाल चौधरी, शाम चौधरी,दिनेश चौधरी,राजु गावीत,प्रशात मोरे,दैनिक पञकार संघाचे सचिव महेंद्र जाधव,समिर दलाल,मनोहर नगराळे, महेश जयस्वाल,प्रविन जयस्वाल, जगदीश जयस्वाल,आदी उपस्थित होते.
शहरासाठी फार चांगले काम
प्रा दिपक जयस्वाल म्हणाले की हा रामरथ नानाश्री ग्रुप बहुउद्देशीय संस्था व कै.देविदास हेमाजी नगराळे नागरी सहकारी पंतसस्था व गुरुप्रसाद रामगोपाल जयस्वाल स्मरणार्थ या तीघांचा आर्थिक सहकार्यातुन तयार करण्यात आला आहे. नवापुर शहराचा वाढता विस्तार पहाता हा रामरथ तयार करण्यात आला ही सेवा मोफत असणार आहे. याचा खर्च जवळपास 3लाख 50 हजार इतका आला आहे. यासंस्था शहरासाठी फार चांगले काम करीत आहे. चांगले कार्य त्यांनी केले आहे.