कॉंग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे; मनोहर पर्रीकर यांचे ट्वीटद्वारे स्पष्टीकरण

0

पणजी- राफेल विमान करारावरून काँग्रेसने गोव्याचे मंत्री विश्वजित राणे यांची ऑडिओ क्लिप जाहीर केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये राफेल व्यवहाराची कागदपत्रे असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून अशा प्रकारची कोणतीच चर्चा कॅबिनेट बैठकीत झाली नव्हती असा खुलासा पर्रिकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी ट्विट केले आहे.

पर्रिकर यांनी कॅबिनेट बैठकीत आपल्याकडे राफेल घोटाळ्यासंबंधीत कागदपत्रे असून आपले कोणीच काही करू शकत नाही, असे म्हटले होते, असा दावा काँग्रेसने विश्वजित राणे यांची ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत प्रसारित करून केला होता.