कॉंग्रेसकडून मोदी-आसाराम बापू यांचा व्हिडीओ व्हायरल

0

पुणे- उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये बलात्कार प्रकरणी जोधपूरच्या विशेष न्यायालयाने आसाराम बापूंना दोषी ठरवलं आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना आसाराम बापू यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी मोदी यांनी आसाराम बापू यांच्याबद्दल गौरोद्गार काढले होते, तो व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल करण्यात आला आहे. २०१३ मध्ये आसाराम बापूंचा मोदींनी गवगवा केला आहे तर आता मोदी पंतप्रधान असतांना आसाराम बापू हे बलात्कार प्रकरणी दोषी आढळले आहे व त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. या घटनेवरून कॉंग्रेसने मोदींना लक्ष करत टीका केली आहे. भाजप सरकारच्या काळात बुवा-बाजींना उत आले असल्याची टीका आधीच कॉंग्रेसकडून होत आहे. आसाराम बापूंना शिक्षा ठोठाविण्यात आल्यानंतर कॉंग्रेसकडून भाजपवर टीका केली जात आहे.