कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ : देवेंद्र फडणवीस

0

जालना-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. शेतकरी, बेरोजगारांना रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, महिला, शिक्षण आदी विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान यावर टीका करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असून ते कधीही पूर्ण होणार नाही, असे सांगितले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना ते जालण्यात बोलत होते.