कॉंग्रेसचा रस्ता रोको : २२ कोटीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

0

पाचोरा : तहसीलदार यांच्या खात्यात बोंडआळीचे अनुदान दिवाळी पुर्वीच जमा होवुन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्याने आज कॉंग्रेस आय कडुन रस्ता रोको आंदोलन होताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तहसीलदार यांनी २२ कोटीचे अनुदान आज दि. १७ नोव्हेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देताच रस्ता रोको मागे घेण्यात आला.

पाचोरा तहसील कचेरीच्या तहसीलदार यांच्या खात्यात बोंडअळीचे जवळपास ४८ गावांचे अनुदान दिवाळी पुर्वीच जमा झाले असतांना केवळ प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पाहीजे तशी होऊ शकली नाही. त्यातच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस आयने तात्काळ अनुदानित पैसा जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. तरी देखील महसूल प्रशासनाने पाहिजे तशी गांभिर्याने दखल घेतले नाही.त्यामुळे येथील जारगांव चौफुलीवर कॉंग्रेसआय तर्फे रास्ता रोको आंदोलन सकाळी ११ वाजता सुरू करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस आयचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. अभय पाटील, जिल्हा आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, लोकसभा बुथ कमिटी अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, दिंगबर पाटील,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक विधानसभा उपाध्यक्ष शकिल शेख,अनिल पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, डॉ. धनराज पाटील, महिला आघाडीच्या संगीता नेवे आदींसह पदाधिकारी व कार्येकत्यांनी रस्ता रोको सुरु केला.

तहसीलदार न आल्याने पोलिस आंदोलकांमध्ये चकमक

दरम्यान आंदोलन तास भर चालल्यावर नायब तहसीलदार भोईटे आंदोलनात सामोरे आले असता शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नावर तहसीलदार कापसे यांनी यावे अन्यथा आम्ही हटणार नाही अशी भूमिका सचिन सोमवंशी, अॅड. अभय पाटील यांच्यासह आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलवडे यांनी आम्ही तुम्हाला अटक करु असे बोलल्यावर आंदोलक संतप्त झाले. महीलांसह अटक करा असे बोलल्यावर एकही महीला पोलीस बंदोबस्तात नसल्यामुळे पोलीसांना नमते घ्यावे लागले.अखेर तहसीलदार बी. ए. कापसे आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी सर्वांच्या समक्ष बोंडआळीचे अनुदान २२ कोटी आजच बॅंकेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्यासाठी आवाहन केले असता आंदोलन थांबविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक चौबे, खरे, पो. हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, नितीन सुर्यवंशी, पो. कॉ. प्रकाश पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते. कॉंग्रेसच्या आंदोलनामुळे ४८ गावांचे शेतकरी आंनद व्यक्त करत आहेत