जळगाव: कॉंग्रेसचे जळगाव महानगर प्रमुख राधेश्याम यांनी आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी महायुतीचे उमेदवार राजुमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव शहरातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी डॉ. राधेश्याम चौधरी इच्छुक होते, मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्यावर आल्याने ते नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र त्यांनी माघार घेतला होता. तेंव्हापासून ते कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा होती, अखेर आज त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.