कॉंग्रेसचे सचिन पायलट यांना शेवटचे ऑफर; बैठकीला येण्याचा फर्मान

0

जयपूर: राजस्थानचे उपमुख्यमंत्री कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने अशोक गेहलोत सरकारची चिंता वाढली आहे. अशोक गेहलोत यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी बंद पुकारले आहे. दरम्यान यात कॉंग्रेस नेत्यांनी मध्यस्थी भूमिका घेऊन आज दुपारी कॉंग्रेस आमदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचा फर्मान सोडण्यात आला असून सचिन पायलट यांनाही शेवटचे ऑफर देण्यात आले आहे.

कॉंग्रेसचे दार सचिन पायलट यांच्यासोबत गेलेले आमदार आणि सचिन पायलट यांच्यासाठी खुले असून त्यांनी दुपारपर्यंत बैठकीला यावे असे फर्मान सोडण्यात आले आहे. सचिन पायलट दिल्लीत असल्याने त्यांना दुपारपर्यंत जयपूरला येणे अशक्य असले तरी त्यांनी फोनद्वारे तसे कळवावे असे आवाहन कॉंग्रेस नेते राजदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे. सचिन पायलट यांच्यासाठी कॉंग्रेसची दारे नेहमी खुली असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

काही मतभेद असतील तर हायकमांडशी चर्चा करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखादा सदस्य नाराज झाल्यास कुटुंब पडण्याचा प्रयत्न करत नाहीत असेही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

कॉंग्रेसकडे आवश्यक संख्याबळ असल्याने कॉंग्रेसची बाजू भक्कम असून दुसरीकडे सचिन पायलट यांची बाजू कमी दिसू  लागली आहे. त्यामुळे आता सचिन पायलट काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसकडून भाजपला लक्ष करण्यात आले आहे. भाजपकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आरोप करण्यात आले आहे.