नवी दिल्ली: संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आणि सभागृहात कागदे भिरकविल्याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज गुरुवारी काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह यांचा समावेश आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्यांकडून गदारोळ सुरू करण्यात आला होता. दरम्यान काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सभापतींना कामकाज तहकुब करावे लागले होते.