कॉंग्रेसच्या काळात फक्त कागदावर सर्जिकल स्ट्राईक व्हायचे; मोदींचा टोला

0

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील सिकर येथे प्रचारसभा घेत आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेसने त्यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करत आहे. कॉंग्रेसने ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगत आहे. मात्र कॉंग्रेसच्या काळात फक्त कागदावर सर्जिकल स्ट्राईक व्हायचे असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला आहे. कागदावर आणि मोबाइलमध्ये व्हिडियो गेममध्ये सर्जिकल स्ट्राईक करायचे असल्यास ६ काय तर २०-२५ सर्जिकल स्ट्राईक देखील होऊ शकतात असा टोला मोदींनी लगावला आहे.