कॉंग्रेसच्या तोंडी पाकिस्तानची भाषा: भाजप

0

नवी दिल्ली: काल केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्याला असलेले स्वायत्तता काढून घेतली आहे. या निर्णयाचे सत्ताधारी आणि मित्र पक्षांकडून स्वगत होत आहे, मात्र काही विरोधी पक्ष याला विरोध करत आहे. कॉंग्रेसने देखील याला विरोध दर्शविला आहे. दरम्यान आज लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सादर करण्यात आले. यावेळी जोरदार चर्चा झाली. दरम्यान भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी कॉंग्रेसच्या तोंडून पाकिस्तानची भाषा निघत असल्याचे म्हटले आहे. काल पाकिस्तानने कलम ३७० हटविणे काळा दिवस असल्याचे म्हटले होते, कॉंग्रेसने देखील कालचा दिवस काळा दिवस होता असे म्हटले आहे. याच्यावरून कॉंग्रेसच्या तोंडून पाकिस्तानची भाषा दिसते असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे.