कॉंग्रेसने आधी शिवसेनेचा शर्ट काढला आता पॅन्ट काढली; सेनेबद्दल चंद्रकांत पाटीलांचे वादग्रस्त विधान !
पुणे: मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्याने भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. वैचारिक मतभेद असतानाही कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे भाजपकडून वारंवार शिवसेनेवर आरोप केले जाता आहे. शिवसेनेवर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्लॅनिंग रचून हिंदुत्वापासून शिवसेनेला दूर नेले. शिवसेनेची जागा मनसेने घ्यावे यासाठी मनसेला पुढे केले जात आहे. शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कॉंग्रेसने शिवसेनेचा हळूहळू एक शर्ट काढला, पॅन्ट काढली असे वक्तव्य केले. कॉंग्रेसचा हा डाव उद्धव ठाकरे यांनी समजून घ्यावा. ते वारंवार सांगतात की मी हिंदुत्व सोडलेले नाही मग त्यांनी 7 मार्चला अयोध्येला जावे, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करावी असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला. पुण्यात ते बोलत होते.