सागर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील सागर येथे प्रचारसभा घेत आहे. या प्रचारसभेत बोलतांना मोदींनी कॉंग्रेसवर निशाना साधला. रिमोट कंट्रोलने सरकार चालविणे असेल किंवा व्हिडियो गेम खेळणे असेल या पलीकडे कॉंग्रेस विचार करू शकता नाही, म्हणूनच तर कॉंग्रेसने १० वर्ष इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यक्तीला पंतप्रधान बनविले अशी टीका मोदींनी केली.
मोदींनी कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधानांना स्वत:चे निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. रिमोट कंट्रोलवर चालणारे पंतप्रधान कॉंग्रेसने दिले. १० वर्ष असाच पंतप्रधान कॉंग्रेसने देशावर लादला अशी टीका मोदींनी केली.