कॉंग्रेसप्रमाणे भाजपात देखील घराणेशाही फोफावते आहे: अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

0

नंदुरबार- लोकसभा निवडणुकीत भाजपाने जे उमेदवार दिले आहेत ते घराणेशाही पोसण्यासाठी दिले आहेत, म्हणून मतदारांनी अशी घराणेशाही संपवण्यासाठी संकल्प करावा, असे आवाहन आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. नंदुरबार येथील सभेत ते बोलत होते. नंदुरबार लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.सुशील अंतुर्लीकर यांच्या प्रचारासाठी दीनदयाल चौकात जाहीर सभा झाली.या सभेला माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, उमेदवार डॉ.सुशील अंतुर्लीकर आदी उपस्थित होते.
कॉंग्रेस प्रमाणे भाजप देखील घराणेशाही पोसत आहे. सत्ता आल्यास ही मंडळी हुकुमशाहीकडे वाटचाल करतील असे आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा दिल्यास आम्ही भाजप-सेनेला पराभूत करू असा इशारा देखील आंबेडकर यांनी यावेळी दिला.