कॉंग्रेसला झटका; मणिपूरचे पाच आमदार भाजपात

0

इंफाळ: कॉंग्रेसमध्ये जोरदार आऊट-गोइंग सुरु आहे. कर्नाटकनंतर मध्यप्रदेशमधील कॉंग्रेस सरकार कोसळले, त्यानंतर राजस्थानमध्ये देखील सचिन पायलट कॉंग्रेस सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान आता मणिपूरमधील पाच आमदारांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पाचही आमदारांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर पाचही आमदारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. दिल्लीत पाचही आमदारांनी भाजप नेते जनरल सेक्रेटरी राम माधव यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह उपस्थित होते.