नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जबरदस्त धक्के बसत आहे. राज्यातील अनेक कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उद्या ते भाजपात प्रवेश करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित झाला असून त्यामुळे भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे संजय सिंह यांनी सांगितले आहे.