नवी दिल्ली: कालपासून संपूर्ण देशात कलाम ३७० हटविण्यात आल्याचीच चर्चा आहे. कॉंग्रेसने या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र यावरून कॉंग्रेसमध्येच एकमत नाही. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी याचे समर्थन केले आहे. कॉंग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील कलम ३७० हटविण्याला पाठींबा दर्शविला आहे. यावरून कॉंग्रेसमध्ये एकजूट नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. काल राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर आज लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले, त्यावर दीर्घ चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान घेण्यात येत आहे. सुरुवातीला आवाजी मतदान घेण्यात आले, मात्र विरोधकांनी मतदानाची मागणी केल्याने यावर प्रक्रिया सुरु आहे.