कॉंग्रेसला धक्का; पुढील वाटचाल ठरविण्यासाठी हर्षवर्धन पाटीलांनी बोलविला कार्यकर्ता मेळावा

0

मुंबई: कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत गेले आहेत. दरम्यान आज देखील केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थिती अनेक नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. दरम्यान माजी मंत्री कॉंग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे देखील कॉंग्रेसला सोडणार असल्याची चर्चा आहे. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आणि पुढील वाटचाल ठरविण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी कार्यकर्ता मेळावा बोलविला आहे. या मेळाव्यात ते पुढील निर्णय जाहीर करणार आहे.

आज सोलापुरात अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राणा जगजितसिंह, माजी आमदार जयकुमार गोऱ्हे आदी भाजपात प्रवेश करत आहेत. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील हे देखील कार्यकर्ता मेळावा घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहे.