मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दरम्यान आज कॉंग्रेसची पहिली उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ४५ उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान यातून विद्यमान ७ आमदारांचे नाव वगळण्यात आले आहे. भाजप-सेनेच्या संपर्कात असलेल्या ७ आमदारांना पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अश्लम शेख, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके, डी.एस.अहिरे, राहुल बोंद्रे, काशीराम पावरा यांचे नाव पहिल्या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आजच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे मेळावा घेत आहे. थोडा वेळात त्यांचा मेळावा सुरु होईल, यात ते विधानसभा निवडणूक लढविणार कि लोकसभा पोटनिवडणूक लढविणार याबाबत घोषणा करणार आहे.