नवी दिल्ली: लोकसभेच्या पराभवाची कारणे कॉंग्रेस पक्ष जाणून घेणार असून त्यासाठी राज्यातील प्रदेशाध्यक्ष यांना पत्र पाठवणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या कारणाचा अहवाल पाठवण्यास सांगितला आहे. पत्रात त्यांनी असे नमूद केले आहे की मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाचा तपशील तयार करून, मतदार संघात कॉंग्रेसला किती मते पडली, मते कमी असतील तर त्याची कारणे काय होती हे कळवण्यास सांगितली आहे.
राज्यातील प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या पत्राचे ११ जून पर्यंत उत्तर मागितले आहे. उत्तर आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत कलहामुळे किती नुकसान झाले आहे, आणि अंतर्गत वाद कसा दूर करावा या साठी कॉंग्रेस पक्षाने बैठक बोलावली असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या प्रभारी महासचिवाकडून तसेच प्रदेश अध्यक्षांकडून मिळालेल्या अहवालावर टिप्पणी मागितली जाईल. त्यातून हे समजून घेता येईल की, पक्षाचा लोकसभा निवडणुकीत एवढा दारूण पराभव का झाला.