हैद्राबाद-राजस्थान आणि तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. भाजप, कॉंग्रेस तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस)कडून जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान तेलंगणा येथे प्रचार सभेत बोलतांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसवर आरोपाच्या फैरी झाडल्या. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने जाहीरनाम्यात मस्जिद आणि चर्चमध्ये मोफत वीज पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून शहा यांनी तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि टीआरएस अल्पसंख्यक समुदायाची दिशाभूल करत असल्याचे आरोप केले आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुक असुउद्दिन ओवैसीच्या भीतीमुळे केसीआर सरकार १७ सप्टेंबरला लिबरेशन डे साजरी करते. जर तेलंगणात भाजपची सत्ता आली तर लिबरेशन डे मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असे आश्वासन अमित शहा यांनी दिले आहे.
तेलंगणात त्रिपक्षीय युद्ध सुरु आहे. एकीकडे केसीआर आणि चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाला एमआयएमसमोर गुडघे टेकायला मजबूर केले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने सिद्धूला पाकिस्तानला सेनाध्यक्षाला गळाभेट करायला पाठवते. तर तिसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रवादी नेतृत्व आहे असे अमित शहा यांनी सांगितले.