मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान सर्व पक्षीय नेते त्यांची रुग्णालयात भेट घेत आहे. दरम्यान आज बुधवारी कॉंग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम आदींनी संजय राऊत यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. आज संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, त्यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी जाणार आहे.
राजकारणाच्या पलीकडे माणुसकीच्या नात्याने हे नेते संजय राऊत यांची भेट घेत आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील संजय राऊत यांची भेट घेतली होती.