नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या प्रवक्त्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्यावर कॉंग्रेसने कारवाई केली आहे. त्यांना प्रवक्ते पदावरून हटविले असून कॉंगेसमधून निलंबित केले आहे. दरम्यान त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पत्र लिहून आभार मानले आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेते असे आहेत ज्यांना ग्राउंड रियालिटीचे भान नाही. सामान्य नागरिकांसोबत त्यांचे कोणतेही काम नाही असे म्हणत राजीनामा देत असल्याचे खुशबू सुंदर यांनी म्हटले आहे. दरम्यान आजच त्या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्या दिल्लीला रवाना देखील झाल्या आहेत.
तामिळनाडूमध्ये खुशबू सुंदर यांचे चांगले राजकीय वजन आहे. त्याचा भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून पुढे आणू शकते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुंदर ह्या कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. २०१८ मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही त्यांनी कामगिरी बजावली आहे.