कॉंग्रेस, बिजू जनता दलाने व्होट बँकेचे राजकारण केले: मोदी

0

सोनेपूर:लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराला वेग आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडीशा दौऱ्यावर असून तेथे ते प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान, सोनेपूर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि बिजू जनता दलावर त्यांनी सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांनी गरीब जनतेचा केवळ राजकारणासाठी वापर केला, असा आरोप त्यांनी केला. गरीबांचा व्होट बँकेसाठी वापर करण्याच्या काँग्रेस आणि बिजदच्या धोरणांमुळे अनेक दशकांपासून ओडिशासह देशभरातील मोठा भाग हा दारिद्र्य रेषेखाली राहिला आणि त्यामुळेच याचा गैरवापर नक्षलवाद्यांनी केला असे आरोप मोदींनी केला.

या निवडणुकाच आता ठरवतील की देशाचे खरे हिरो असणारे अधिक सक्षम होतील की पाकिस्तानचा पुरस्कार करणारे होतील. आमच्या जवानांना, शेतकऱ्यांना आणि तरुणांना सन्मान मिळाले पाहिजे की टुकडे-टुकडे म्हणणाऱ्यांचा आवाज घुमला पाहिजे हे तुम्हीच ठरवा असेही मोदींनी यावेळी सांगितले.