कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते माझ्या संपर्कात: राधाकृष्ण विखे पाटील

0

सोपापूर: नुकतेच कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात दाखल होऊन मंत्री झालेले गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी धक्कादायक असे वक्तव्य केले आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते युतीत प्रवेश करण्यासाठी माझ्या संपर्कात असल्याचे गौप्यस्फोट त्यांनी केले आहे. सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळ एमी देखील भाजपात गेलो असे त्यांनी सांगितले. सोलपुर जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्या संपुरकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.