मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पक्षाला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्र राजे यांच्या पाठोपाथ आता आमदार वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.
उद्या त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.