लातूर:पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मतदारांना संबोधित करण्यासाठी मोदी आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे प्रचारसभा घेत आहे. त्यांची प्रचारसभा सुरु आहे. मोदींनी यावेळी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली. विशेषत:त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. काँग्रेस आणि त्यांच्या महामिलावट सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट बनली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभी आहे. काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला. या सभेला भाजपा-शिवसेना युतीनंतर उद्धव आणि मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले.
कॉंग्रेस देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. कॉंग्रेसने आपला चेहरा आरशात पाहावा, त्यांच्या तोंडून मानवाधिकारची गोष्ट शोभा देत नाही, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार हिरावणारी कॉंग्रेस मानवाधिकारच्या गप्पा मारत आहे अशी टीका मोदींनी केली.
Next Post