मुंबई: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे. ही गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची परिस्थिती आहे. अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत गेले आहे. दरम्यान आता उत्तर महाराष्ट्रात देखील कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री विजयकुमार गावित यांची कन्या कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. कर्माळ येथील राष्ट्रवादीच्या माजी आमदार रश्मी बागल यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे भाजप-शिवसेनेतील प्रवेश रखडला होता. आज पुन्हा प्रवेश सुरु झाला आहे.